कृषी यांत्रिकीकरणAgrostar
दगड-गोटा गोळा करणारं भन्नाट यंत्र!
➡️शेतकऱ्यांसाठी आपल्या पडीक जमिनीला लागवडी योग्य बनवण्यासाठी एक मशीन विषयी माहिती घेऊन आलो आहोत. हि मशीन सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. विनोद तांबारे राहणार अंदुरे गाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद.हे पहिले शेतकरी ठरले आहे, कि ज्यांनी हे मशीन प्रथम महाराष्ट्रात आणले आहे.त्यांच्या या मशीनचा उपयोग त्यांनी त्यांचे मित्राच्या शेतात केला आहे.
➡️विजयसिंह धोंडीराम गव्हाणे तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून त्यांची जमीन आहे १५ एकर त्यातील काही माळरानातील जमीन आहे.
➡️माळरानातील जमीन जवळ जवळ ७० वर्ष पडून होती कारण तिथे कोणतेच पीक घेता येत नव्हते.आणि दगड व धोंडे मजुरांमार्फत गोळा करणे हे परवडणारे नव्हते.परंतु त्यांचे मित्र विनोद तांबारे यांनी दगड धोंडे गोळा करण्याचे यंत्र मागवले.
➡️हे यंत्र कसे काम करते हे पाहण्यासाठी गव्हाणे यांनी त्यांच्या माळरानातील जमीन मध्ये या यंत्राचा उपयोग केला आणि बघता बघता जमिनीतील सर्व दगड, धोंडे गोळा करून दिले. एक तासात जवळ जवळ ५ ट्रॉली दगड गोळा करून दिले.म्हणजे हि मशीन ५ पटीने काम करते. हे मशीन ट्रॅक्टर ला जोडून जमिनीतील दगड वेचणीसाठी एकरी २४०० रुपये दर खर्च येतो.
➡️हे मशीन विजयसिंह धोंडीराम गव्हाणे मित्र विनोद तांबारे यांनी मध्य प्रदेश मधून मागवले आहे. विजयसिंह धोंडीराम गव्हाणे म्हणतात,या मशीन द्वारे आमची पडीक जमीन लागवडीच्या योग्य करून दिली आहे. हि, मशीन शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.