AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
थोडकीच माहिती भरून मिळवा शेतकरी क्रेडिट कार्ड!
कृषी वार्ताAgrostar
थोडकीच माहिती भरून मिळवा शेतकरी क्रेडिट कार्ड!
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधादेखील देण्यात येत आहे, त्या अंतर्गत 1.6 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड या दोन्ही योजना विलीन झाल्या आहेत. अशा वेळी किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे झाले आहे. याद्वारे अर्जदारांचा डेटा पडताळणीचे कामही खूप सोपे झाले आहे. विशेष बाब म्हणजे सर्व शेतकरी या योजनांचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी ची पद्धत - • अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी पंतप्रधान किसान योजना पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी. • किसान क्रेडिट कार्ड अर्ज फॉर्म डाउनलोड करा. • हा पर्याय वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिसून येईल, जो डाउनलोड केसीसी फॉर्म डाउनलोड नावाने उपलब्ध आहे. • शेतकऱ्यांना हा एक पानांचा फॉर्म भरावा लागेल. • फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे, पिकाची माहिती भरावी लागेल.
754
0
इतर लेख