AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
थकीत कर्जावर व्याज आकारू नये: राज्य सरकार
कृषि वार्ताअॅग्रोवन
थकीत कर्जावर व्याज आकारू नये: राज्य सरकार
मुंबई – महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर १ ऑक्टोबर २०१९ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व कार्यकारी सेवा सहकारी सहकारी सोसायटयांनी व्याज आकारणी करू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सहकार विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत दोन लाख रूपये कर्ज माफ केले जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या विशेष बैठकीत लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर ३० सप्टेंबर २०१९ नंतर योजनेचे लाभ प्रत्यक्ष मिळेपर्यंत व्याज आकारणी न करण्याच्या मुद्दयावार तत्व सहमती दर्शविली आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २० जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
30
0