पशुपालनAgrostar
थंडीमुळे जनावरांवर येणाऱ्या ताणावर उपाय!
🌱सध्या तापमानात घट होत आहे व थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. दुधाळ जनावरांमध्ये थंडीमुळे पडणारा ताण ओळखून योग्य उपाययोजना केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते, उत्पादन वाढते.
🌱थंडीमुळे पडणारा ताण म्हणजे काय?
• गायी शरीराच्या २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमानाला तर म्हशी शरीराच्या ३६ अंश सेल्सिअस तापमानाला बाहेरील वातावरणाच्या तापमानावर सुरळीत कार्य करतात, यालाच थर्मोन्यूट्रल झोन असे म्हणतात.
• ज्यावेळेस वातावरणातील तापमानाची पातळी थर्मोन्यूट्रल झोनच्या खाली येते त्यावेळी जनावरावर ताण येतो. या ताणाला हिवाळ्यातील ताण असे म्हणतात आहार ग्रहणावर होणारे परिणाम वातावरणातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्यास सुरवात होते तेव्हा जनावराच्या शरीरावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होते. त्यामुळे आहार घेण्याचे प्रमाण मंदावते, त्यामुळे शरीरक्रियेला लागणाऱ्या उर्जेची आवश्यकता वाढते.
• जनावर उर्जेच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान योग्य त्या स्थितीत ठेवण्यास असमर्थ होते, त्यामुळे पचनसंस्था व दूध उत्पादनावर परिणाम होतो.
• उर्जेची कमतरता व शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राखून ठेवण्यासाठी जनावर शुष्क घटक ग्रहण करण्याचे प्रमाण वाढवते, त्यामुळे शरीरातील चयापचयाचा वेग वाढून तापमान नियंत्रणात ठेवण्यात मदत होते
🌱घ्यायची काळजी:
• तापमानावर लक्ष ठेवून हिवाळ्यात जनावराच्या आहारात बदल करावा.
• बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे संरक्षण होईल याप्रमाणे गोठ्यात बदल करावेत.
• गोठ्यातील जमीन ऊबदार राहण्यासाठी आणि गोठा कोरडा राहण्यासाठी जमिनीवर वाळलेले गवत किंवा धान्याचा भुसा पसरावा. दोन ते तीन दिवसांनी आच्छादन बदलावे.
• दुधाळ जनावरांच्या आहारात दाणा मिश्रण व सुक्या चाऱ्याचा समावेश करावा. आहारात हरभरा, ज्वारी किंवा गहू कुटाराचे प्रमाण वाढवावे
• जनावराला पूर्ण वेळ पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याचे तापमान जनावराच्या शरीराच्या जवळपास म्हणजे ३७ ते ४० अंश सेल्सिअस असावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.