सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
थंडीपासून फळबागा वाचवा!
➡️ राज्यात पुढचे ५ दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तापमानात ३ ते ५ अंशांनी घट होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थंडीनं अख्खा महाराष्ट्र गारठला त्यात अवकाळी पावसाचा तडाखाही बसला आहे.
➡️ वाढत्या थंडीचा दुष्परिणाम रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे.तसेच सध्या महाराष्ट्रात आंबा, मोसंबी, संत्रा, लिंबू, द्राक्ष, काजू, डाळिंब, सीताफळ, अंजीर, केळी, चिकू इत्यादी फळ बागांचे खूप नुकसान होत आहे. अशा स्थितीत पीक कसं वाचवावं असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. त्यासाठी उपाययोजना या लेखात आपण घेऊया
➡️ जमिनीत हवेचा दाब हा वातावरणातील दाबापेक्षा कमी होतो. जमिनीतील दाब कमी, पानांच्या, खोडाच्या पेशीतील पाणी गोठलेले जाते .याचा परिणाम फळझाडांवर आढळतो.
थंडीमुळे होणारे परिणाम-
* नवीन फळबाग लागवड केलेल्या रोपांना आणि कलमांना व कलमीकरण केलेल्या फळझाडास डोळे फुटण्याचे प्रमाण कमी होते.
* बियाण्यांची उगवण उशिरा होते, उगवणीचे प्रमाण कमी होते.
* प्रकाशसंश्लेषणाचा वेग मंदावतो.
* झाडाची वाढ खुंटते.
* मुळांची वाढ खुंटते.
* पानांचा आकार कमी होतो. पर्यायाने पर्णभार कमी होतो.
* अन्ननिर्मितीची क्षमता कमी होते.
* कोवळ्या फांद्या, पाने गळून पडतात. काही वेळा पूर्ण झाडही (थंडीची लाट अधिक दिवस राहिल्यास) सुकून जाते. कारण त्याच्या सर्व पेशी थंडीमुळे गोठून मरण पावतात.
* फूलगळ होते.
* फळ तडकणे किंवा भेगा पडणे यांसारखी विकृती दिसते.
नवीन फळबाग लागवड केलेल्या बागेत व रोपवाटिकेत खालीलप्रमाणे थंडीचा परिणाम आढळतो :उपाययोजना
➡️ फळबागेस रात्री पाणी देणे,
➡️ विहीर बागायत असल्यास पहाटे पाणी देणे, शेकोट्या करणे, विद्राव्य खतांची फवारणी करणे, आच्छादनाचा वापर करणे,
➡️ उत्तर-पूर्व व दक्षिण-पूर्व बाजूने कुंपण करणे, जिवंत कुंपण (विंड ब्रेक्स) करणे किंवा वारा प्रतिरोधक झाडे लावणे (शेल्टर बेल्टस् लागवड) इत्यादी. अति तांत्रिक फळबाग लागवडीमध्ये पॉलीहाऊस उभारणे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.