अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
थंडीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला!
➡️ थंडीमध्ये तापमान खूप कमी असल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. यासाठी शक्य असेल तर पीक लागवडी पूर्वी मशागत करतेवेळी जमिनीतुन चांगले कुजलेले शेणखत वापरावे व पीक वाढीच्या च्या काळात ठिबक असेल तर त्यामधून जैविक खतांचा वापर करावा.
➡️ जेणेकरून जिवाणूंच्या हालचालींमुळे जमिनीतील तापमान वाढून पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होऊन पिकाची जोमदार वाढ होईल.
➡️ तसेच उभ्या पिकात चिलेटेड झिंक @1 ग्रॅम प्रति लिटर घेऊन पिकावर फवारणी करावी अथवा ठिबकद्वारे @ 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे सोडावे. जेणेकरून पिकाचा शेंडा चांगला वाढून पीक वाढीस मदत होईल.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.