गुरु ज्ञानAgroStar
थंडीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना
👉🏻थंडीच्या हंगामात तापमान खूप कमी असल्यामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. अशा परिस्थितीत पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
👉🏻पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जिवाणूंची हालचाल सुधारेल. ठिबक सिंचन प्रणाली असल्यास पिकाच्या वाढीच्या काळात जैविक खतांचा वापर करावा. जिवाणूंच्या हालचालीमुळे जमिनीचे तापमान वाढते, ज्यामुळे पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
👉🏻उभ्या पिकाच्या पोषणासाठी 39.5% झिंक घटक असणाऱ्या झिंक्सची फवारणी करावी. फवारणीसाठी झिंक्स 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे. ठिबक प्रणालीद्वारे झिंक्स @ 200 मि.ली. प्रति एकर या प्रमाणात सोडल्यास पिकाचा शेंडा चांगला वाढतो व पिकाला पोषण मिळून झपाट्याने वाढ होते.
👉🏻हे उपाय केल्याने थंडीत पिकाची वाढ जोमाने होऊन चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय व जैविक पद्धतींचा वापर सातत्याने करावा.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.