AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
थंडीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
थंडीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
थंडीमध्ये तापमान खूप कमी असल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. यासाठी शक्य असेल तर पीक लागवडी पूर्वी मशागत करतेवेळी जमिनीतुन चांगले कुजलेले शेणखत वापरावे व पीक वाढीच्या च्या काळात ठिबक असेल तर त्यामधून जैविक खतांचा वापर करावा. जेणेकरून जिवाणूंच्या हालचालींमुळे जमिनीतील तापमान वाढून पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होऊन पिकाची जोमदार वाढ होईल. तसेच उभ्या पिकात चिलेटेड झिंक @0.75 ग्रॅम प्रति लिटर घेऊन पिकावर फवारणी करावी अथवा ठिबकद्वारे @ 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे सोडावे. जेणेकरून पिकाचा शेंडा चांगला वाढून पीक वाढीस मदत होईल. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-051&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
35
इतर लेख