AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तेजपत्ता शेतसाठी ३०% शासकीय अनुदान!
योजना व अनुदानkrishi jagran
तेजपत्ता शेतसाठी ३०% शासकीय अनुदान!
➡️शेतीमध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत शेतकरी बांधव आता आधुनिकतेची कास धरून शेती करू लागले आहेत.कृषी तज्ञांच्या मते, शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत नगदी पिकांची तसेच कायम मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करणे अपरिहार्य बनत चालले आहे. आज आपण नेहमीच मागणी मध्ये असलेल्या तेज पत्ता अर्थात तमालपत्र या मसाला पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. ➡️तमालपत्र शेती विषयी सर्वात महत्वाची आणि फायद्याची बाब म्हणजे याच्या शेतीसाठी जास्त खर्च करावा लागत नाही. याची शेती करणे तुलनेने सोपे असून अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते. ➡️तमालपत्राच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते. आता यातून मिळणार्‍या उत्पन्नाबद्दल बोलायच झालं तर एका तमालपत्राच्या रोपातून वर्षाला सुमारे 3000 ते 5000 रुपये मिळू शकतात. अशा पद्धतीने 25 झाडांपासून वर्षाला 75,000 ते 1,25,000 रुपये कमावता येतात. तमालपत्रची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते ➡️शेतकरी मित्रांनो जर आपणास या पिकाची लागवड करायची असेल तर आपण 5 बिघा शेतजमिनीत तमालपत्राची शेती करू शकता. जेव्हा तमालपत्र झाडाचा आकार घेते तेव्हाच आपल्याला झाडाची काळजी घ्यावी लागते. याच्या शेतीतून आपण दरवर्षी चांगले उत्पन्न मिळू शकतात. ➡️संदर्भ: Krishi Jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख