AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकामध्ये बीजप्रक्रियाचे फायदे
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकामध्ये बीजप्रक्रियाचे फायदे
शेतकरी सध्याच्या काळात तूर पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहत आहे.तूर लागवडीच्या सुरवातीपासूनच या पिकाकडे लक्ष दिल्यास पिक उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होतो. आज आपण तूर पिकामधील बिजप्रक्रियेचे फायदे पाहणार आहोत.
• तूर पिकामध्ये मर रोग होऊ नये, म्हणून ट्रायकोडर्मा प्लस ५ ग्रॅम प्रति किलो बियाणास लावावे. बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीटकनाशकची बीजप्रक्रिया करावी व यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी._x000D_ • जमिनीतील स्थिर असलेले स्फुरद पिकाला उपलब्ध होण्यासाठी पी एस बी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणांची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते._x000D_ • बीजप्रक्रियेमुळे बियाणांची उगवण चांगली होते._x000D_ • जमिनीची शास्त्रीय पद्धतीने उत्पादकता व सुपीकता वाढते._x000D_ • जीवाणू संवर्धन रासायनिक खतापेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे कमी खर्चात उत्पादनात वाढ होते._x000D_ • बीजप्रक्रियामुळे उत्पादनाबरोबर पिकाची गुणवत्ता ही सुधारते._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस_x000D_
172
1