AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकातील विषाणूजन्य रोगाची लक्षणे व व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील विषाणूजन्य रोगाची लक्षणे व व्यवस्थापन!
१) वांझ रोग - रोपावस्थेत झाडाच्या पानांवर प्रथम गोलाकार पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान पडून कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरातील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटून झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा येत नाहीत व ती शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो. जास्त पाऊस, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जास्त आर्द्रता रोगाच्या वाढीस पोषक आहेत. • उपाय - याच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे वेळोवेळी उपटून टाकावीत. व आधीच्या हंगामातील बांधावरील तुरीचा खोडवा उपटून नष्ट करावा. २) पर्णगुच्छ - या विषाणूजन्य रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. पर्णगुच्छयुक्त झाडे शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. झाडाच्या शेंड्याची वाढ थांबल्यामुळे आजूबाजूच्या फांद्या वाढतात. त्यामुळे झाडास पर्णगुच्छाचा आकार येतो. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास, फुलांची संख्या कमी होऊन ती छोट्या आकाराची, वाळलेली व पोपटी रंगाची दिसून येतात. शेंगा आकाराने लहान होऊन वेड्यावाकड्या स्वरूपात येतात. अशा शेंगांतील दाणे सुरकुतलेले दिसतात. • उपाय - रोगग्रस्त झाडे नष्ट करावीत. रोगवाहक किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे नियंत्रण करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
9