AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकातील किडींची ओळख आणि त्यांचे नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील किडींची ओळख आणि त्यांचे नियंत्रण!
तूर पिकामध्ये बऱ्याच वेळा उत्पादन कमी होतना दिसते. अनेक कारणांमुळे या पिकामध्ये कमी होत असते, त्यातील एक कारण म्हणजे किड. म्हणून या किडींची ओळख करून त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेंगा पोखरणारी अळी - अळीचा रंग हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली आवस्था पूर्ण करते. शेंगमाशी - ही अळी पांढऱ्या रंगाची असून ती गुळगुळीत असते व तिला पाय नसतात. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून माशी बाहेर पडल्यावरच नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. पिसारी पतंग - या पतंगाची अळी हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरवडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. पाने गुंडाळणारी अळी - या किडीचा पतंग लहान व तपकिरी रंगाचा असतो. प्रामुख्याने या किडीचा प्रादुर्भाव पेरणी उशिरा केल्यास तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असल्यास आढळून येतो. तुडतुडे - या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातून रस शोषण करतात. त्यावेळी विषारी लाळ पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि गळून पडतात. खोडमाशी - या किडीची माशी खोडामध्ये अंडी घालते, अंड्यामधून बाहेर पडलेली अळी कोवळ्या भागावर उपजीविका करते आणि नंतर कोवळे खोड पोखरून आत शिरते. शेंगेवरील ढेकुण - हिरवट तपकिरी रंगाचे छातीच्या बाजूला अनुकुचीदार काटे असतात. या किडीच्या बाल्यावस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील रस शोषण करतात व शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळून जातात. कीड उपाययोजना :- • तूर पिकांमध्ये हेक्टरी ५० ते ६० पक्षीथांबे करावे यामुळे पक्षी अळ्यांचे भक्षण करतील. • एकरी पिकांमध्ये तीन ते चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावावे. • पिकास फुले, कळ्या लागताच. ५ % निंबोळी अर्क फवारावे. • पीक ५० % फुलोऱ्यात असताना स्पीनोसॅड ४५ %एस.सी. ४ मि.लि प्रति पंप पाण्यात मिसळून फवारावे. • दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी. इमामेक्टीन बेण्झोएट ५ %एस.जी. ५ ग़ॅम किंवा फ्लुबेंडामाईड ३९.% एस.सी. ५ ग़ॅम याची फवारणी करावी. गरजेनुसार शेंगा पक्वता अवस्थेत क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १८.५ % एस.सी. ३ ते ४ मि.लि. किंवा क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १०% +लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % झेड सी. ६ प्रति पंप पाण्यात मिसळून फवारावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
64
39