AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकाची मर होत आहे का?
गुरु ज्ञानAgrostar
तूर पिकाची मर होत आहे का?
🌱तूर पिकातील मर रोगालाच तूर उधळणे देखील म्हंटले जाते. या रोगाचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये रोप अवस्थेपासून ते फुले व शेंगा भरणीपर्यंत कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव फुस्यारीअम उडम या बुरशीमुळे होतो. पावसाचा खंड पडल्यास, अतीरिक्त पाऊस तसेच पाणथळ व भारी जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. 🌱 प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम झाडाची शेंड्याकडील पाने कोमेजतात. कालांतराने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात व फांद्या शेंड्याकडून वाळतात. अतिरिक्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पूर्ण झाड वाळलेले दिसते. मूळ चिरले असता मुळाच्या आत मध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी रंगाची रेघ दिसते. कधीकधी खोडावर पांढरी बुरशी सुद्धा आढळते. प्रादुर्भाव झाल्यानंतर मर रोग नियंत्रण करणे शक्य नसल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. प्रादुर्भाव झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक नियोजन करावे.  गेल्यावर्षी ज्या शेतात तुरीला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या शेतात तसेच पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत तूर लागवड करणे टाळावे.  पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा तुरीच्या शेतात दुसरे पीक घावे.  तूर पीक पेरणी पूर्वी चांगले कुजलेले शेणखत व त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्यावे व वखरणी करून चांगले जमिनीत मिसळून द्यावे यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची व ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होते, जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो.  जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले वाण लागवडीसाठी निवडावे.  पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.  पाण्याचा ताण पडू न देता पाण्याचे योग्य नियोजन करावे.  पेरणीझाल्यानंतर शेतात जास्त पाणी साचून देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे.  प्रादुर्भाव दिसू लागल्यास रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी  प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेपूर्वी जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 % डब्लूजी घटक असणारे कूपर-1 500 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी घटक असणारे धानुस्टीन 500 ग्रॅम प्रति एकर खातांना चोळून द्यावे. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
7
इतर लेख