AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
• शिफारस केलेल्या वाणांची वेळेतच योग्य अंतरावर पेरणी करणे आवश्यक असते. • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. पेरणीच्या वेळी तुरीच्या बियाणात १०० २०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे टाकावे. • शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. • शेतात पक्ष्यांना बसप्यासाठी मचाण म्हणजचे इंग्रजी 'टी' आकाराचे पक्षी थांबे ५०-६० प्रती हेक्टरी उभारावेत, शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर (१० अळ्या प्रती १० झाडे) असल्यास किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळून आल्यास पीक संरक्षणाचे उपाय योजावेत. • केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यास अळ्या व अंडीपुंज वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून किडींची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल. • अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळुवार हलवून अळ्या पाडून त्या गोळा करून नष्ट कराव्यात. तसेच पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. • पीक कळ्या, फुलावर आल्यापासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचे मादी पतंग मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास सुरुवात करतात. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. • पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना शेतकरी बांधवांनी आठवड्यातून किमान एक वेळा हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण व निरीक्षण करून कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. अशाप्रकारे तुरीवरील किडींचे प्रभावी कीड नियंत्रण जर अंमलात आणले तर तुरीचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
7
इतर लेख