AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीचे उत्पन्न होणार जोमदार ! जाणून घ्या .
गुरु ज्ञानAgrostar
तुरीचे उत्पन्न होणार जोमदार ! जाणून घ्या .
🌱खरीप हंगामा तील तुर हे महत्त्वाचे पीक असून या कडधान्यांमध्ये १५ ते २० टक्के प्रथिने असतात. तूर हे शरीरासाठी उत्तम असे पोषण देते🌱 ➡️जमीन तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी ( Medium- heavy) पाण्याचा उत्तम निचरा ( We'll drained) होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही.जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. ➡️पेरणीची वेळ ( 15 June - 10 July) जमिनीत वाफसा येणे पिकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानले जाते.जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी करावी. जर उशिरा लागवड केली तर पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात घट येत. ➡️बीज प्रक्रिया - तुरीचे बीजप्रक्रिया महत्वाची आहे.प्रति किलो बियाणांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम ( Rhizobium)व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन १० किलो बियाणांस गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करावी. ➡️पेरणी - पाऊस वेळेवरती झाला तर जूनच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात रान वापश्यावर आले की पेरणी करावी. उशिरा पेरणी करु नये. जर उशिराने आपण पेरणी केली तर उत्पन्नामध्ये घट येते. सलग पिकांसाठी साधारणता ४५ x १० सें.मी व अधिक कालावधीच्या वाणांसाठी ६० x २० से.मी अंतर ठेवावे. ➡️ खत व्यवस्थापन - पेरणी च्या अगोदर ५ टन / हेक्टर चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.सलग तुरीसाठी पेरणीवेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद वेळी द्यावे. जर आंतरपीक घेतली तर ज्या पिकाच्या ओळी जास्त आहेत, त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करिता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी. ➡️वाण - पेरणीसाठी आय.सी.पी.एल- ८७ (120 दिवस), ए.के.टी.- 8811 (140 दिवस), बी.एस.एम.आर.- ८५३ (१६० दिवस), बी.एस.एम.आर.- ७४६ (17१७०0 दिवस), विपुला (१४५- १६० दिवस) हे वाण निवडावेत. ➡️आंतरपिके - १. तूर -बाजरी (१-२) : बाजरी मध्ये तुरीचे आंतरपीक घेता येते. यासाठी ४५ सेंमी अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पध्दतीने पेरणी करावी. २. तूर - कापूस(१-६ किंवा १-८) : कपाशीच्या ६ किंवा ८ ओळीनंतर एक ओळ तुरीची लागवड करावी. कपाशीच्या जाती मध्ये बी.डी.एन-७१६, बी.एस.एम.आर-८५३, बी.एस.एम.आर-७३६ या जातींची लागवड करावी. ३. मुग- तूर: पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची लागवड करावी. ➡️पेरणीची अंतर आय.सी.पी.एल-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ बाय १० सेंमी अंतरावर लागवड करावी. तसेच मध्यम कालावधीतील जातीची ६० बाय २० सेंमी किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर लागवड करावी. ➡️बियाणे प्रमाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या शिफारशीनुसार तूरीचे प्रतिहेक्टर बियाणे प्रमाण १२ ते १५ किलोएवढे आहे. फक्त तूरीचे पीक घेतल्यास गरव्या जातीचे १२ ते १६ किलो बी, निमगरव्या जातीचे १६ ते २४ किलोबी आणि हळव्या वाणांसाठी २० किलोबी प्रती हेक्टरी पेरावे. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
4
इतर लेख