AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला फक्त आधार कार्डद्वारे मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या कसे?
समाचारलोकमत
तुम्हाला फक्त आधार कार्डद्वारे मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या कसे?
➡️जर तुम्हाला कर्ज घेऊन काही महत्वाचे काम करायचे असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण. सध्याच्या काळात कर्ज घेणे आधीपेक्षा सोपे झाले आहे. जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. तुम्हाला केवायसी कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील आणि त्यामुळे बँकेला सर्व माहिती मिळेल. तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज देखील करू शकता. ➡️आधार कार्डच्या मदतीने तुम्ही झटपट वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल आणि ई-केवायसी डाक्युमेंट द्यावे लागतील तुम्हाला कोणत्याही दस्तावेजाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची आवश्यकता नाही. जाणून घ्या, आधार कार्डद्वारे कसे मिळेल कर्ज? ➡️ सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. ➡️यानंतर तुम्हाला कर्जाचा (loan) पर्याय मिळेल. तुम्हाला पर्सनल लोनचा पर्याय निवडावा लागेल आणि त्यावर क्लिक करून पात्रता तपासावी लागेल. त्यानंतर अप्लाय नाउ(Apply Now) वर क्लिक करावे लागेल. ➡️अर्ज भरून, तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील तसंच रोजगार तपशील भरावा लागेल. ➡️तसेच, यात तुम्हाला आधार कार्डची कॉपी अपलोड करावी लागेल. ➡️ तुम्हाला बँकेकडून एक कॉल येईल, जो तुमचा तपशील आणि पात्रता पडताळेल. पडताळणीनंतर तुमचे कर्ज मंजूर होईल. -➡️कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात बचत खात्यात जमा होतील. काय आहेत नियम आणि अटी? ➡️कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी २३ ते जास्तीत जास्त ६० असावे लागेल. तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे सार्वजनिक, खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी असणे आवश्यक आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
8