योजना व अनुदान न्युज १८ लोकमत
तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल!
➡️आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी तरतूद करून ठेवावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अनेक प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात आहेत. मुलींचं शिक्षण हा आर्थिक बोजा वाटू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. खास मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ही त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे. ➡️सुकन्या समृद्धी योजना ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत आणण्यात आली आहे. अगदी छोट्या बचतीतून सगळ्यांत चांगलं व्याज देणारी ही योजना आहे असं म्हटलं जातं. सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणतंही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत तुम्ही अकाउंट उघडू शकता. मुलीचा जन्म झाल्यानंतर ती दहा वर्षांची व्हायच्या आत कमीत कमी २५० रुपये भरून या योजनेसाठी अकाउंट उघडलं जाऊ शकतं. एका आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा केले जाऊ शकतात. ➡️सध्या या योजनेअंतर्गत दर वर्षाला ७.६ टक्के व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत कुणीही आपल्या दोन मुलींसाठी अकाउंट उघडू शकतं. २१ वर्षं पूर्ण झाल्यानंतर मुलगी स्वत: या अकाउंटमधून पैसे काढू शकते. या योजनेमध्ये ९ वर्ष ४ महिन्यांत रक्कम दुप्पट होते. ➡️सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत किंवा १८ वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत हे खातं खुलं राहू शकतं. ➡️तुम्ही या योजनेअंतर्गत दर महिना तीन हजार रुपये गुंतवले तर दर वर्षीच्या एकूण ३६,००० रुपयांवर तुम्हाला 14 वर्षांनंतर ७.६ टक्के वार्षिक कंपाउंड इंटरेस्ट रेटच्या हिशोबाने ९,११,५७४ रुपये मिळतील. २१ वर्षं म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम जवळपास १५,२२,२२१ रुपये इतकी होईल. ➡️मुलीच्या पुढच्या आयुष्यासाठीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठीच सुकन्या समृद्धी योजना महत्त्वाची आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
173
5