AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुकडेबंदी कायद्यात सरकारने काय केलेत बदल?
कृषि वार्ताAgroStar
तुकडेबंदी कायद्यात सरकारने काय केलेत बदल?
👉🏻तुकडे बंदी कायद्यानुसार जमिन 20 गुंठ्यांपेक्षा कमी असल्यावर ती विक्री करणे अवघड होत होते आणि त्यामुळे अनेक व्यक्तींना घरकुल घेणे, जमीन घेऊन त्यावरती विहीर खोदणे, शेत जमिनीसाठी रस्ता घेणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. 👉🏻तुकडेबंदी कायदा अंतर्गत अर्धा एकर पेक्षा कमी बागायती जमीन किंवा दोन एकर पेक्षा कमी जिरायती जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही. कधीकधी शासनाच्या प्रकल्प अधिग्रहणानंतर राहिलेली छोटी जमीन भूभाग तुकडे बंदी कायद्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत होती. 👉🏻तुकडे बंदे कायद्यामध्ये 14 मार्च 2024 रोजी बदल घडवून आणून नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे संबंधित परिपत्रकानुसार शेतजमीन रस्ता, घरकुल, विहीर खोदणे अशा कारणांसाठी जमिनीची खरेदी विक्री ग्राह्य करण्यात आलेले आहेत परंतु यासाठी अनेक अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेले आहेत. 👉🏻जर तुम्हाला तुकडेबंदी कायद्यांतर्गत जमीन खरेदी विक्री करायची असेल तर यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल आणि आपण ज्या कारणासाठी जमीन खरेदी विक्री करत आहोत संबंधित जमिनीचा त्याच कारणासाठी उपयोग झाला पाहिजे.तुकडे बंदी कायद्याअंतर्गत बागायती जमिनीमध्ये 20 गुंठ्यापेक्षा कमी किंवा जिरायती जमिनीमध्ये 80 गुंठा पेक्षा कमी जमिनीची हस्तांतरित प्रक्रिया होत नव्हती. यामुळे ज्या गावांमध्ये गट स्कीम नाही अशा गावातील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. 👉🏻तसेच जर एखाद्या सरकारी प्रोजेक्टमध्ये जमीन गेली आणि एकूण जमिनीच्या मर्यादित क्षेत्र पेक्षा कमी जमीन शेतकऱ्याकडे राहिली तर शेतकऱ्याला संबंधित जमिनीच्या हस्तांतरण करता येणार आहे आणि घरकुल बांधण्यासाठी हजार चौरस फुटापर्यंत जमीन खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आलेली आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
3