AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, हीट स्ट्रोकचा धोका!
हवामान अपडेटAgrostar
तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, हीट स्ट्रोकचा धोका!
आता खूप गरमी आहे!🌞 उन्हाचा तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि कडक उन्हात बाहेर जाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा हवामानात हीट स्ट्रोक म्हणजेच लू लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. 👉 हीट स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा शरीराचे तापमान 40°C पेक्षा जास्त होते आणि शरीर ते सामान्य स्थितीत आणू शकत नाही. याची लक्षणे म्हणजे चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, खूप घाम येणे किंवा अचानक घाम बंद होणे, आणि काही वेळा बेशुद्ध होणे. 👉 बचाव कसा करायचा? ✅दुपारी १२ ते ३ या वेळेत घरात राहा किंवा सावलीतच काम करा. ✅हलके, सुती आणि सैलसर कपडे घाला. ✅डोक्यावर टोपी किंवा गमछा ठेवा. ✅भरपूर पाणी प्या आणि लिंबूपाणी, ताक, नारळपाणी असे द्रव पदार्थ घ्या. ✅काम करताना थोडा थोडा वेळ विश्रांती घ्या. ✅ जर शरीरात थकवा जाणवू लागला, चक्कर आली किंवा घाम येणे बंद झाले तर तात्काळ थंड ठिकाणी जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडी सावधगिरी, मोठा बचाव! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
0
इतर लेख