गुरु ज्ञानAgroStar
तीळ पिकाची कापणी प्रक्रिया!
🌱वाणांच्या कालावधीनुसार तीळ पीक साधारणतः 90 ते 100 दिवसांत तयार होते. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस सुरुवात करावी. तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी जमिनीवर पडून नुकसान होते त्यामुळे कापणी वेळेवर करावी. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. 3 ते 4 दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावेत. मळणी झाल्यानंतर बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.