कृषि वार्ताAgroStar India
तापमान वाढीचा पिकावर होणारा परिणाम
तापमान 38°C पर्यंत पोहोचत आहे, ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तापमानवाढीचा प्रभाव कमी करण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
👉उपाययोजना:
✅ पाण्याचे व्यवस्थापन – ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करा आणि अनावश्यक पाणीटंचाई टाळा.
✅ खतांचा संतुलित वापर – नत्र, पालाश आणि सिलिकॉनयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करा.
✅ फवारणीचे योग्य वेळापत्रक – सकाळी व संध्याकाळीच फवारणी करा आणि समुद्री शेवाळे अर्क वापरा.
✅ हवामान बदलाचा सामना – पिकांची योग्य लागवड आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसंख्या वाढविण्यावर भर द्या.
👉हे उपाय अवलंबल्यास शेतकरी आपल्या पिकांचे आरोग्य टिकवू शकतात. अधिक माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा!
👉संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.