AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तांदळाची शासकीय खरेदी १०१ लाख टनपेक्षा अधिक
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
तांदळाची शासकीय खरेदी १०१ लाख टनपेक्षा अधिक
चालू खऱीप विपणन हंगाम २०१९-२० मध्ये न्यूनतम समर्थन मुल्य (एमएसपी) वर तांदळाची खरेदी १०१.२२ लाख टन झाली आहे. आतापर्यंत खरेदी सर्वात जास्त खरेदी पंजाबमधून ६३.०८ लाख टन व हरियाणामधून ३७.३९ लाख टन आहे.
भारतीय खादय निगम (एफसीआई) च्या अनुसार पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेली तांदळाचे समर्थन मुल्यवर खरेदी १०१.२२ लाख टन झाली आहे. पंजाब व हरियाणा व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधून चालू खरीप समर्थन मुल्यवर ४०,२९५ टन, तामिळनाडू २०,८६६ टन, चंदीगड १०,४७६ टन व केरळ २,१९९ टन भाताची खरेदी झाली आहे. चालू खरीप विपणन हंगामासाठी तांदळाच्या खरेदीचे लक्ष्य ४१६ लाख टन आहे, जे की मागीलवर्षी खरेदी केलेल्या ४४३.३१ लाख टनपेक्षा कमी आहे. चालू खरीप विपणन हंगामासाठी पंजाबवरून तांदूळ खरेदीचे लक्ष्य ११४ लाख टन ठरविले होते, तर हरियाणावरून खरेदीचे लक्ष्य ४० लाख टन, उत्तर प्रदेश ३३ लाख टन, ओडिसा ३४ लाख टन, छत्तीसगड ४८ लाख टन व आंध्र प्रदेश ४० लाख टन, तेलंगाणा ३० लाख टन, बिहार १२ लाख टन, मध्य प्रदेश १४ लाख टन आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ३१ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
58
0