AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तरुण शेतकऱ्याने केली मशागतीविना शेती !
नई खेती नया किसानAgrostar
तरुण शेतकऱ्याने केली मशागतीविना शेती !
➡️ उत्पादनवाढीसाठी शेती व्यवसयात नवनवीन प्रयोग करणे ही काळाचा गरज झली आहे. असेच प्रयोग घेऊन आता तरुण शेतकरी या व्यवसयात पदार्पण करीत आहेत. पारंपारिक शेतीला फाटा देत पुणे जिल्ह्यातील भोरमधील माळवाडी शिवारात किरण यादव या तरुण शेतकऱ्याने अनेकांना आशेचा किरण मिळेल असाच प्रयोग केला आहे. एसआरटी म्हणजेच शून्य मशागत शेतीचा हा प्रयोग केला आहे. यामुळे उत्पादनात वाढ तर झालीच आहे पण खर्चही कमी होत आहे. किरणचा हा अत्याधुनिक उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे थेट बांधावर दाखल झाले होते. किरण यांनी केलेल्या अभिनव उपक्रमामुळे त्यांना शासनाकडूनही अनेक पारितोषिके मिळाली असून आता या भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांचा हा प्रयोग नवसंजीवनी ठरत आहे ➡️ काय आहे शून्य मशागती शेती : 👉🏻दिवसेंदिवस उत्पादनावरील खर्च वाढत आहे. शिवाय खर्च करुनही पीक पदरी पडेल असे सांगता येत नाही. त्यामुळे उत्पादनावर खर्च करुन अधिकचे उत्पादन पदरी पाडून घेणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. त्याच अनुशंगाने माळवाडी येथील किरण यादव यांनी एस.आर.टी म्हणजेच शून्य मशागत शेती असे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे उत्पादनावरील खर्चात बचत होत आहे. 👉🏻शिवाय यंत्राच्या सहाय्याने शेती होत असल्याने सर्व काही जिथल्या तिथे. त्यामुळे शेतीचे रुपडेच बदलत आहे. यामुळे आताउत्पादनातही वाढ होत असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे मोठे योगदान 👉🏻पुण्यातील भोरमधील माळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी किरुण यादव यांनी एसआरटी पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली यशस्वी शेतीची पाहणी करण्यासाठी परदेशी अभ्यासकांनी भेट दिली.यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉक्टर संतोष भोसले आणि डॉक्टर विवेक भोईटे उपस्थित होते. 👉🏻कृषी विज्ञान केंद्राकडून शून्य मशागत शेती मार्गदर्शन आणि शिवार भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यामुळे येथील प्रगतशील शेतीचे उदाहरण आता जगभर दिले जाणार आहे. शिवाय या भागातील शेतक-यांना याचा फायदा व्हावा हा उद्देश कृषी विज्ञान केंद्राचा राहणार आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
4