AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती!
नोकरीन्युज १८ लोकमत
तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती!
➡️ महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात इथे लवकरच तब्बल 1013 जागांसाठी भरती होणार आहे.यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती भूकरमापक तथा लिपिक - एकूण जागा 1013 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️ या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. ➡️ तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ➡️ उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे. ➡️ उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार भूकरमापक तथा लिपिक - 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक ➡️ (बायोडेटा) ➡️ दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला ➡️ जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ➡️ ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ➡️ पासपोर्ट साईझ फोटो वयोमर्यादा ➡️ या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी १८ते ३८ वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ डिसेंबर २०२१ या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा संदर्भ:- न्युज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
23