सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी!
आजच्या काळात शेतकरी वर्गाला शेतातील पिकांमध्ये खुरपणीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी ग्रामीण भागात मजुरांची कमतरता जाणवते. पिकांमध्ये खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास, शेतकऱ्यांचा वेळेचे व आर्थिक नुकसान या दोन्ही गोष्टीना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेच शेतकरी हे खुरपणीऐवजी तणनाशकाची फवारणी करून तणांचे नियंत्रण करतात. तणनाशक फवारणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी: • तणनाशक खरेदी करताना मुदत संपलेली तणनाशक खरेदी करू नयेत. • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत वापरावी. • तणनाशकची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा. • तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट, गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा. • तणनाशकची फवारणी जोराचे वारे नसताना करावी तसेच २-३ तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी. • आपल्या पिकाभोवती इतर कोणती पिके आहेत ते लक्षात घेऊन फवारणी करावी. • जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेटनोझलचा वापर करावा. • तणनाशक फवारणी करताना होलोकोन व सॉलिडकोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही. उपलब्ध उत्पादने AGS-CP-325,AGS-CP-260,AGS-CP-030,AGS-CP-136,AGS-CP-575 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
11
इतर लेख