सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी
१) विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत. २) मुदत संपलेली तणनाशके वापरू नये तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी. ३) तणनाशके फवारणीसाठी स्वतंत्र नॅपसॅक पंप वापरावा. ४) तणनाशके फवारताना जमिनीमध्ये ओल असावी,जमीन भुसभुशीत असावी.
५) तणनाशके जाराचे वारे नसताना फवारावे तसेच पाऊस न येण्याची शक्यता पाहूनच फवारावे. ६) फवारा जमिनीवर मारताना मागे मागे सरकत जावे जेणे करून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाही. ७) ग्लयायाफोसेट सारखे बिनानिवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी २१ दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये. ८) तणनाशके फवारणी सर्वत्र समान दाबाखाली करावी फवारणीसाठी प्लॅटपॅन किंवा फ़्लडजेट नोझल वापरावे. ९) उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो हूडचा वापर करावा. १०) तण नियंत्रणासाठी परिस्थिती नुसार तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा वारंवार वापराचा अतिरेक टाळावा तणनाशके फवारणी केलेल्या जमिनीत गांडूळखत,शेणखताचा वापर करावा.
220
0
इतर लेख