सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी
• तणनाशकांची निवड, वापरावयाचे प्रमाण व वेळ इत्यादींबाबत योग्य माहिती असावी. • पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वीचीच तणनाशके वापरावीत. उदा. एकदल पिकात ॲट्राझीन; तर द्विदल पिकांसाठी पेंडीमिथॅलीन. • उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठी ही तणनाशकांचा वापर करता येतो, मात्र त्यासाठी पिकाचा वर्ग माहित असणे आवश्‍यक आहे. • उभ्या पिकात तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तणे २ ते ४ पानांवर असताना फवारणी करावी.
• तणनाशकांची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा तसेच किमान २ ते ३ तास सूर्यप्रकाशदेखीलअसावा._x000D_ • पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फ्लॅटपॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. फवारणीचा अंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी._x000D_ संदर्भ –अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस, १० जानेवारी २०१९
842
1
इतर लेख