किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तंबाखू अळीचे जीवनचक्र
 वांगी पिकातील हि प्रमुख कीड आहे. याकिडीमुळे फळांचे ३०-५०% नुकसान होते. परिमाणी पिकाच्या उत्पादनात घाट येते. चला तर जाणून घेऊया या किडीचे जीवनचक्र.  या किडीची मादी एकानंतर एक अशी २५० अंडी झाडाच्या पानावर, शेंड्यावर, फुलकळ्यांवर आणि कोवळ्या फळांवर घालते. अंडी गोलाकार व सफेद पिवळसर रंगाची असतात. हि अंडी ३-५ दिवसांनी उबतात व त्यातून सफेद अली बाहेर पडते. हि अली पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणेवेळी फळांमध्ये नुकसान करते. हि अळी १२-१५ दिवसांनी प्रौढ बनून गुलाबी रंगाची दिसते, नंतर ती शेंडा अथवा फळांमधून निघून जमिनीत अथवा पालापाचोळ्यात किंवा मुळाजवळ कोषावस्थेत जाते. आठवडाभराच्या कालावधीनंतर कोषामधून प्रौढ (पतंग) बाहेर येतो. प्रौढांचे आयुष्य ६-१७ दिवसांचे असते.
नुकसानीची लक्षणे:- • पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. • लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे छिद्र बंद करते. • अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात. व्यवस्थापन:- • खरे तर, उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल वे नगरात केल्यास या अळीचे कोष नष्ट होऊन प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मदत होते. • पिकात प्रादुर्भाग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. • प्रादुर्भावग्रस्त शेंडे कापून नष्ट करावे. • पिक फुलावर यायच्या अगोदर एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत. • पिकामध्ये अळीची अंडी आढळून आल्यास निमार्क या कीटकनाशकाची फवारणी करावी. • या किडीचा अधिक प्रादुर्भाव दिसून आल्यास थायक्लोप्रिड २१.७०% एससी @३०० मिली किंवा थायोडीकार्ब ७५% डब्ल्यूपी @४०० ग्रॅम किंवा सायपरमेथ्रीन ३% + क्विनॉलफॉस २०% ईसी @१६० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
28
0
इतर लेख