किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तंबाखू अळीचे जीवनचक्र
तंबाखू अळी एक बहुभुज किटक आहे. हि बटाटे, टोमॅटो, कोबी, फुलकोबी, वाटाणे आणि चवळी या पिकांवरील मुख्य कीड आहे. अळ्यामुळे पिकांचे थेट नुकसान होते. चला तर मग तंबाखू अळीच्या वाढीच्या अवस्था पाहूया._x000D_ किडीच्या अवस्था:- _x000D_ अंडी अवस्था:- किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्‍याने अंडी घालते. हि अंडी तपकिरी रंगांची असून अंड्यावर तपकिरी केस असतात. अंड्याचा कालावधी ३-५ दिवसांचा असतो._x000D_ अळी अवस्था:- पुंजक्यातून काही दिवसातच अळ्या बाहेर पडतात. सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या अळ्या हिरव्या रंगाच्या असून, कालावधी २ ते ३ आठवड्यांचा असतो._x000D_ कोषावस्था:- कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था आठ ते दहा दिवसांची असते. किडीचा पूर्ण जीवनक्रम ३१ ते ३३ दिवसांत पूर्ण होतो._x000D_ प्रौढ अवस्था:- किडीचा पतंग व अळ्या दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानांखाली लपून राहतात व रात्री बाहेर निघतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात._x000D_ नुकसानीची लक्षणे:- _x000D_ • पुंजक्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात._x000D_ • मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात._x000D_ • या किडींचा प्रादुर्भाव फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत देखील दिसतो._x000D_ नियंत्रण:- _x000D_ • या किडीच्या नियंत्रणासाठी या किडीच्या प्रजनन क्षमतेवर वार करायला हवा. एक जोडी हजारोच्या क्षमतेने अंडी घालत असल्याने जर आपण पतंग नियंत्रित केले तर पिकाचे मोठे नुकसान टळेल. यासाठी आपण शेतात कामगंध सापळे लावावेत. हेक्टरी १५ सापळे बसवावेत._x000D_ • तसेच पिकाच्या चारी बाजूने एरंड पीक किंवा सापळा पिके घ्यावीत._x000D_ • रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २.५ मिली प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस २ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी._x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
26
0
इतर लेख