AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज!
✅विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे सरक्षण करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. ✅दरम्यान राज्यात उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर आला आहे. किमान तापमानाचा पारा 11 ते 22 अंशांच्या दरम्यान असून, थंडी कमी झाली आहे. आज देखील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ✅पुढील ४८ तासात विदर्भातील काही जिल्ह्यात हा अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी कायम आहे. तर आपल्या भागात कशी राहील हवामान स्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ✅संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
1