AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीला मोठा फायदा!
कृषि वार्ताAgrostar
ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीला मोठा फायदा!
👉कृषी ड्रोन योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना असून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची अशी योजना आहे. या माध्यमातून 50 टक्के अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्र या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. 👉कृषी ड्रोन योजनेचे स्वरूप: 👉शेतकऱ्यांना जर ड्रोन खरेदी करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना अनुदान देण्यात येते. ड्रोन खर्चाच्या 50% किंवा कमाल पाच लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. हे अनुदान प्रामुख्याने पदवीधर सुशिक्षित तरुण,अनुसूचित जाती जमाती, लहान व सीमांत शेतकरी व महिला शेतकरी यांना दिले होते. 👉या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीच्या खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये आर्थिक मदत देखील दिली जाते. तसेच कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदी करायचा असेल तर कृषी यंत्रणा 100% पर्यंत अनुदान देते. 👉ड्रोनचा वापर अगदी सोप्या पद्धतीने करता यावा याकरिता शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांना केंद्र सरकारच्या कृषी यंत्रणा प्रशिक्षण व चाचणी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग देखील दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ड्रोन वापरायला चालना तर मिळेलच परंतु या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होतील. 👉ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीसाठी फायदा : 👉ड्रोन चा विचार केला तर यामध्ये जीपीएस, अनेक प्रकारचे सेन्सर्स, हाय क्वालिटी कॅमेरे, प्रोग्राम करणे योग्य नियंत्रक आणि नेवीगेशन सिस्टम चा समावेश असतो. या सगळ्या सिस्टमच्या आधारे ड्रोन हा शेतीसाठी चांगल्या प्रकारची अचूक माहिती देते. या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या मदतीने सगळ्या माहितीचे संकलन करून ती उपयुक्त माहिती शेतीसाठी वापरता येते. 👉यामध्ये पीक निरीक्षण तसेच पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण असे विविध प्रकारचे महत्त्वाच्या बाबी या माध्यमातून करता येतात. 👉पिकांना जर ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर एका एकर क्षेत्राची फवारणी पाच ते दहा मिनिटात होते.तसेच ड्रोनला ऑटो सेंसर असल्यामुळे ते विशिष्ट उंचीवर उडते व या माध्यमातून संपूर्ण शेतीचे निरीक्षण तुम्ही एका जागी बसून करू शकतात. ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली तर कीडनाशके व खते तसेच होणारा खर्च देखील वाचतो. 👉संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
94
27
इतर लेख