AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ड्रोन खरेदीसाठी लाखोंचे अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
ड्रोन खरेदीसाठी लाखोंचे अनुदान!
➡️केंद्र सरकारकडून ड्रोनच्या खरेदीवर ५० टक्के सबसिडी दिली जात आहे . विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता. ➡️कृषी ड्रोन अनुदान योजनेचे वैशिष्टये : 👉🏻कृषी ड्रोन अनुदान योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे त्यामुळे देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 👉🏻राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणे हा योजने मागचा प्रमुख उद्देश आहे. 👉🏻ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोन च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे 👉🏻कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यास मदत होईल. 👉🏻या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 👉🏻कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल जेणेकरून या योजनेमध्ये पारदर्शकता बनून राहील. ➡️कृषी ड्रोन वापरण्याचे फायदे: 👉🏻ड्रोनद्वारे शेतकरी सहजपणे त्यांच्या पिकांवर खते आणि इतर रसायनांची फवारणी करतात. 👉🏻तसेच शेती कामासाठी लागणार वेळ वाचतो. 👉🏻रसायनांचा अपव्ययही कमी होईल. 👉🏻 ड्रोनच्या साहाय्याने रसायनांची फवारणी कमी वेळेत होईल. 👉🏻शेतकरी कीटकनाशकांच्या संपर्कात येत नाहीत. 👉🏻ड्रोनमध्ये बसवलेल्या हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या आरोग्याच्या नोंदी घरी बसून आरामात ठेवू शकतात. ➡️आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत. 2. खरेदी करावयाच्या ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक/कोटेशन. 3. बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश. 4. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र. 5. संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र. 6. अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी ) ➡️अधिक माहितीसाठी क्लिक करा: https://agricoop.nic.in/en/agriculturereforms-1 ➡️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
11
इतर लेख