AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याबळीराजा स्पेशल
ड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड!
शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रुट या फळपिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, उत्तम निचरा होणारी जमीन असावी. लागवड अंतर १२ बाय ८ फूट ठेवल्यास एकरी ४०० सिमेंट पोल व सिमेंट रिंग लागतात. एकरी १६०० रोपांची संख्या होते. लागवडीनंतर १४ महिन्यानंतर फुलधारणा होऊन फळे लागण्यास सुरवात होते. कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधे, खते, गरज नाही. जैविक खते व औषधे यांचा वापर करू शकतात. सेंद्रिय खत शेणखत गांडूळ खत निंबोळी पेंड करंज पेंड इत्यादी वापरून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. कमी खर्चात अधिक उत्पादन या पिकापासून मिळू शकते. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - बळीराजा स्पेशल., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
9
6