AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डी.ए.पी. वरील सब्सिडी वाढवली सरकारचा मोठा निर्णय !
समाचारAgrostar
डी.ए.पी. वरील सब्सिडी वाढवली सरकारचा मोठा निर्णय !
➡️वाढत्या किमतीसदभात मादी सरकारचा मोठा निर्णय, DAP वरील सब्सिडी वाढवली. मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. डीएपीच्या कीमती वाढताच मोदी सरकारने यावरील सब्सिडीदेखील वाढवली आहे. जागतिक स्थरावर किंमती वाढल्या असल्या तरी डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात, सरकारने डाय अमोनियम फास्फेट (डीएपी) खतावरील सब्सिडी 140 टक्क्यांनी वाढवली असल्याचेही एका निवेदनात म्हणण्यात आले आहे. ➡️निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली, यावेळी जागतीक स्थरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतक-यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. DAP खतासाठी असलेली 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी वाढवून, आता 1200 रुपये प्रति बॅग करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात DAP च्या किंमती वाढल्या असल्या तरी, ते शेतक-यांना 1200 रुपयांनाच विकण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. ➡️तर, वाढलेल्या किमतींचा अतिरिक्त बोजा केंद्र सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गत वर्षी, डीएपीची वास्तविक किंमत 1,700 रुपये प्रति बॅग होती, यात केंद्र सरकार 500 रुपये प्रति बैंग सब्सिडी देत होते. यामुळे कंपन्या शेतक-यांना 1200 रुपये प्रति बॅग, या दराने खत विकत होत्या. मात्र, आता DAP मध्ये वापरले जाणारे फॉस्फोरिक ऍसिड आणि अमोनिया आदिंच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्थरावर 60 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
15
इतर लेख