AgroStar
डीएपी खतावरील अनुदानात १४,७७५ कोटी रुपयांनी वाढ!
कृषी वार्तालोकसत्ता
डीएपी खतावरील अनुदानात १४,७७५ कोटी रुपयांनी वाढ!
➡️ युरियानंतर, डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे. खतांच्या किमती वाढत असल्या, तरी शेतकऱ्यांवर त्यांचा बोजा पडू नये यासाठी डीएपीसह इतर काही खतांवरील अनुदानात केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी १४,७७५ कोटी रुपयांनी वाढ केली. ➡️ युरियानंतर, डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे. डीएपी खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्राने गेल्या महिन्यात घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डीएपी खतावरील अनुदानात वाढ करण्यास आर्थिक व्यवहारांबाबतच्या मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली असल्याचे रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- लोकसत्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
6
इतर लेख