AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळींब आंबे बहारातील फुलकळी निघण्यासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
डाळींब आंबे बहारातील फुलकळी निघण्यासाठी उपाययोजना!
➡️आंबे बहारात जानेवारी - फेब्रुवारी मध्ये फुले येतात. ➡️योग्य अश्या फुलधारणे साठी बागेस पाणी देताना हवामान, हंगाम व जमिनीची प्रत (प्रकार) इत्यादी बाबींचा विचार करून पाणी योग्य प्रमाणात देणे. खतांचा योग्य तसेच संतुलित प्रमाणात वापर असावा. ➡️गर्भधारणा व्यवस्थित होण्यासाठी, फुलकळी भरगच्च लागण्यासाठी अमिनो ऍसिड घटक असलेले फ्लोरेन्स २ मिली सोबत मायक्रो न्यूट्रियंट घटक असलेले ग्रेड २ हे १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी ➡️ अधिक फुलधारणेसाठी चिलेटेड कॅल्शियम १० ग्रॅम/१५ ​लिटर आणि बोरॉन १५ ग्रॅम/१५लिटर, १० दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ➡️ तसेच कळी निघायच्या अवस्थेमध्ये १२:६१:०० विद्रव्ये खत ४ किलो प्रति एकर याप्रमाणे चार दिवसांच्या आंतराने दोन ते तीन वेळा द्यावे. ➡️अशा प्रकारे नियोजन केल्यास सद्य परिस्थितीत (प्रतिकूल) फुलधारणा चांगली होईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
5