कृषि वार्ताAgroStar India
डाळिंब बागेत 50% नुकसान करणारी कीड
👉अनार बटरफ्लाय ही डाळिंब पिकाला मोठे नुकसान करणारी किड आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर काळात तिचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. फळाची साली हिरवी असतानाच किड अंडी घालते आणि अळी बाहेर येऊन फळ पोखरते, ज्यामुळे उत्पादनात 50% पर्यंत घट होऊ शकते.👉फळांवर छोटे भोक, सुकलेला रस किंवा काळे डाग दिसले की प्रादुर्भावाची शक्यता जास्त असते.👉नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप, धूर पद्धत, स्वच्छता, चुकार फळे तत्काळ काढणे, तसेच योग्य Biological आणि Chemical उपाय प्रभावी ठरतात. वेळेवर ओळख आणि योग्य व्यवस्थापन केल्यास डाळिंब पिकाला किडीपासून संरक्षण मिळू शकते.👉संदर्भ: AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.