AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब फळांवरील ठिपके रोग नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब फळांवरील ठिपके रोग नियंत्रण!
🌱अल्टरनेरीया बुरशीमुळे पानांवर वेडेवाकडे, तपकिरी ते गर्द तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके मोठे होऊन पाने करपल्यासारखी दिसून कालांतराने पिवळी पडून गळतात. सुरुवातीला फळांवर गोलाकार ते वेडेवाकडे लहान तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. पुढे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यावर बुरशीचे ठिपके लालसर तपकिरी ते गर्द तपकिरी किंवा काळपट तपकिरी रंगाचे होतात. हे ठिपके सुरुवातीला फळाच्या सालीवर पडून नंतर फळांच्या आतील भाग कुजतो. 🌱यावर उपाययोजना म्हणून बागेतून पाण्याचा निचरा चांगला होईल याकडे लक्ष द्यावे. प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. तसेच रोग नियंत्रणासाठी फवारणीसाठी प्रोपिनेब 70 % घटक असणारे अँट्राकोल बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरावे. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
8
इतर लेख