AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकामध्ये आच्छादनाचे फायदे!
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब पिकामध्ये आच्छादनाचे फायदे!
👉डाळिंब हे मुख्यत्वे उष्ण व कोरड्या वातावरणात वाढणारे पीक आहे. या पिकास आच्छादन केल्याने भरपूर फायदे होतात. सेंद्रिय अच्छादनांमध्ये झाडांचा वाळलेला पालापाचोळा, वाळलेले गवत, केळीची किंवा नारळाची पाने, उसाचे पाचट, गहू किंवा धानाचा कोंडा, लाकडाचा भुस्सा, शेतातील पिकांचे अवशेष इ. चा वापर केला जातो. 👉आच्छादनांमुळे होणारे फायदे खालील प्रमाणे. 👉तण नियंत्रण करण्यास मदत होते. 👉झाडाची मुळे असणाऱ्या भागांवर ही आच्छादने अंथरली जात असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाऊन डाळिंब झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते. 👉जमिनीच्या दिवस रात्रीच्या तापमानात संतुलन राखले जाऊन मुळीची वाढ व कार्यक्षमता वाढते. 👉 जमिनीची धूप कमी करण्यास मदत होते. 👉 जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ होऊन अन्नद्रव्ये उपलब्धता वाढते. 👉 जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूंचे प्रमाण वाढते. 👉फळे तडकण्याचे प्रमाण कमी होते. 👉झाडाची वाढ, उत्पादन व विशेषतः गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होते. 👉संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
16
0