अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
डाळिंब पिकात फळ फुगवणीसाठी नियोजन!
➡️आंबिया बहार घेतलेले डाळिंब पिक फळ धारणा झालेली असून फळ पक्वतेच्या अवस्थेत असेल, यावेळी फळ फुगवण जास्तीत जास्त होण्यासाठी पालाश आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर आपल्याकडून वाढविला जातो. वाढता उन्हाचा सामना करत असताना तसेच झाडावर नवीन पाने येऊन फळे जास्तीत जास्त सावलीत येण्यासाठी विद्राव्ये खतांच्या मधून काही वेळेस नत्रयुक्त ग्रेड जसे की १९:१९:१९ किंवा १३:०:४५ किंवा २०:२०:२० यांचा वापर अवश्य करावा. सोबतच मॅग्नेशियम वापराने पण आपण डाळिंब पिकाची पालवी वाढवू शकतो.
➡️संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.