AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील थ्रिप्स चे नियंत्रण!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
डाळिंब पिकातील थ्रिप्स चे नियंत्रण!
थ्रिप्स (फुलकिडी) ची ओळख - ➡️ या किडीच्या दोन प्रजाती डाळिंबावर आढळून येतात. त्या म्हणजे पिवळया रंगाचे फुलकिडे आणि काळया रंगाचे फुलकिडे. ➡️ दोन्ही प्रकारचे फुलकिडे जास्त प्रमाणात आपल्याकडील डाळिंबावर निदर्शनास येतात. ➡️ किडीचा आकार लहान असून लांबट निमुळते शरीर असते. ➡️ या किडीला ‘खरडया’ असेही म्हणतात. ➡️ या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्याकरिता झाडावरील उमललेले फुल जर आपण तळहातावर झटकले तर फुलकिड्यांचे असंख्य किडे आपल्या हातावर पडतात आणि ते आपल्याला डोळयाने सहजपणे दिसतात. नुकसानीचा प्रकार - ➡️ फुलकिड्यांची पिल्ले आणि प्रौढ किडे पानांवरील, कोवळया फांद्यावरील आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यावतून स्त्रावणार्या रसावर / पेशीद्रव्यावर उपजिविका करतात. परिणामतः प्रादुर्भाव झालेली पाने वेडीवाकडी होतात. फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग खरवडल्यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होवून अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. नियंत्रण - ➡️ याच्या नियंत्रणासाठी सायट्रेंनिलिप्रोल १०.२६ ओडी @७.५ मिली १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनदा प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
11
इतर लेख