AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब ठिपके रोग नियंत्रण उपाय
गुरु ज्ञानAgroStar
डाळिंब ठिपके रोग नियंत्रण उपाय
👉अल्टरनेरीया बुरशीमुळे पानांवर वेडेवाकडे, तपकिरी ते गर्द तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन पाने करपल्यासारखी दिसतात आणि नंतर पिवळी पडून गळतात. सुरुवातीच्या टप्प्यात फळांवर गोलाकार ते वेडेवाकडे लहान तपकिरी ठिपके दिसतात, जे नंतर लालसर तपकिरी ते काळपट तपकिरी होतात. हे ठिपके फळांच्या सालीवर पडून आतल्या भागाचा नाश करतात, ज्यामुळे फळे कुजतात. 👉रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. बागेत पाण्याचा निचरा चांगला होईल याकडे लक्ष द्यावे आणि प्रादुर्भाव झालेली फळे त्वरित काढून नष्ट करावीत. 👉रासायनिक उपाय म्हणून, कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीमुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकाची गुणवत्ता टिकवली जाऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास आणि वेळीच उपचार केल्यास पिकाचे नुकसान टाळता येते. 👉 स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
0
इतर लेख