डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन
🌱आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. या बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते तसेच आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण अतिशय कमी असते. उत्पादन चांगले मिळते. जास्त काळ सूर्यप्रकाश मिळाल्याने व कोरडे हवामान यामुळे फळांची प्रत सुधारते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार नियोजन करणे फायदेशीर ठरते. 🌱नैसर्गिक ताण: १. डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती देणे, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. २. जमिनीनुसार डाळिंबाच्या बागेला ताण द्यावा. बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर 30-35 दिवस पाणी तोडावे. तसेच मध्यम- भारी जमिनीत 40-45 दिवस पाणी बंद करावे. ३.डाळिंबाची साधारण 60 टक्क्यांपर्यंत शेंड्याची वाढ थांबून पाण गळ झाल्यास नैसर्गिक ताण बसला असे समजावे. 🌱पानगळ: १. डाळिंबाची साधारण 60 टक्क्यांपर्यंत पाण गळ झाल्यास राहिलेली पानगळ करणेसाठी इथ्रेल 1.5 मिली अधिक 0:52:34 @ 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी घ्यावी. इथ्रेल फवारणी नंतर साधारण 80 टक्के पानगळ होणे आवश्यक असते. २. बागेला योग्य नैसर्गिक ताण देऊन पानगळ न करता इथ्रेलची फवारणी केली तर फुलांऐवजी शेंडे निघणे तसेच सेटिंग लांबणे अशा समस्या येतात, सेटिंग चांगली होणेसाठी नैसर्गिक पानगळ झाल्यानंतरच इथ्रेलची फवारणी घ्यावी. 🌱छाटणी: १. डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात म्हणून डाळिंबाची छाटणी करणे गरजेचे आहे. पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकी छाटणी करावी. यासाठी झाडाच्या परिपक्व पेन्सील आकाराच्या काड्या ठेवून त्यावर फळे धरावीत. २. छाटणी करताना रोगट, तेलकट डागाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. ३. छाटणी झाल्यानंतर त्वरित डाळिंब झाडाच्या वयानुसार शेणखत, निंबोळी पेंड, रासायनिक खते बेड मध्ये भरून पहिले पाणी सोडून द्यावे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5
इतर लेख