AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
डाळींबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही एक मोठी समस्या आहे. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. रोगाची ओळख: डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. रोगाची लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो. • सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. • फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते. • खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. • फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. • फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात. रोगास अनुकूल बाबी: • जीवाणूंची वाढ २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता ८०% पेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते. • बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे. • ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे. • फळ हिरव्या रंगांच्या अवस्थेत असताना लवकर प्रादुर्भाव होतो. एकात्मिक रोग नियंत्रण: • बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर झाडाखाली भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी. • झाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालुन छाटाव्यात. • छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी १% डेटोलच्या द्रावणात निर्जंतुक करुन घ्यावी. • पानगळ व छाटणीनंतर बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)/ बोर्डोमिश्रण (१ %) यांची फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खालील ४ फवारण्या ५ दिवसांच्या अंतराने कराव्यात पहिली - कॉपरहायड्रॉक्साईड २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन ०.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम + सर्फेक्टंट ०.५ मि.लि/लिटर दुसरी - कार्बेन्डाझिय १ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन ०.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम + सर्फेक्टंट ०.५ मि.लि/लिटर तिसरी - कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन ०.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम + सर्फेक्टंट ०.५ मि.लि/लिटर. चैाथी - मँकोझेब (७५ %) २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन ०.3 ग्रॅम +ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम + सर्फेक्टंट ०.५ मि.लि /लिटर. टीप - सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या ३० दिवसापुर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या २० दिवसापुर्वी बंद करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स _x000D_ _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
114
28