AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंबमधील सुत्रकृमींचे नियंत्रण
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंबमधील सुत्रकृमींचे नियंत्रण
भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये डाळिंब लागवडीचे प्रमाण वाढले असून डाळिंबाच्या झाडाचे विविध कीड व रोगांमुळे नुकसान होते. झाडाच्या मर रोगाबरोबर डोळ्यांना न दिसणाऱ्या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव डाळिंबात जास्त प्रमाणात दिसत असल्याने सुत्रकृमींचे वेळेवर नियंत्रण करणे गरजेचे आहे.
१) कलमे तयार करताना सुत्रकृमीयुक्त माती वापरू नये. २) डाळिंब लागवडीपूर्वी १ ते २ वर्ष जमिनीमध्ये भाजीपाला व कडधान्यांची पिके घेतलेली नसावी. ३) डाळिंब लागवडीपूर्वी जमिनीची २ ते ३ वेळा खोल नांगरट करून उन्हाळाभर जमीन तापून द्यावी. ४) डाळिंबाची कलमे लावताना खड्डयामध्ये निंबोळी पेंडचा वापर करावा. ५) डाळिंबामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, काकडी इ. आंतरपिके घेऊ नये. ६) डाळिंब बहार धरते वेळी जमिनीत झाडांच्या मुळांजवळ १ ते १.५ किलो प्रति झाड निंबोळी पेंडचा वापर करावा. ७) सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी जैविक खतांचा वापर करावा. उदा. पॅसिलोमायसिस, ट्रॉयकोडर्मा प्लस, सुडोमोनस यांचा वापर केल्यास सुत्रकृमींवर नियंत्रण करता येते. संदर्भ –अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
248
7
इतर लेख