क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
डब्ल्यूटीओच्या बैठकीत होणार महत्वाच्या मुद्दयावर चर्चा
विश्व व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) च्या २५ सदस्यांची बैठक देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात १३-१४ मे रोजी होणार असून या बैठकीत काही महत्वपूर्ण मुद्दयावर चर्चा होणार आहे. या चर्चेच्या माध्यमातून काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या बैठकीत कृषी या क्षेत्राविषयी सार्वजनिक पुरवठा यासारख्या विषयांवर विचार केला जाऊ शकतो.
भारताने डब्ल्यूटीओच्या २५ विकसनशील सदस्य देशांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक यासाठी महत्त्वपूर्ण आहे की, काही देश जिनिव्हा स्थित विश्व व्यापार संघटनेच्या तर्कसंगतेवर प्रश्न उठवत आहेत. याव्यतिरिक्त अनेक देश व्यापाराबाबत सुरक्षेचे पाऊल उचलत आहे, ज्यामुळे जागतिक व्यापार प्रभावित होत आहे. डब्ल्यूटीओच्या अंतर्गत काही सुधारणा व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे की, या प्रकारच्या दिशानिर्देश बनविले पाहिजे. ज्यामुळे उच्च आर्थिक पाठिंबा असणारे देशांना विशेष आणि भिन्नता असणाऱ्या उपायांचा (एसएंडडी) फायदा झाला नाही पाहिजे. त्यानुसार ही व्यवस्था केवळ विकसनशील आणि गरीब राष्ट्रांसाठीच असली पाहिजे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १७ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख