AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ठिबक संच वापरताना घ्यावयाची काळजी
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ठिबक संच वापरताना घ्यावयाची काळजी
१) ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण ३ ते ४ पीपीम एवढे असते असे पाणी ठिबक सिंचना करिता वापरण्यास घातक असते .कारण त्यामुळे तोट्या बंद पडण्याचा धोका असतो. २) ठिबकसिंचन संचाच्या पी, व्ही ,सी च्या उपमुख्य नळ्या किंवा मुख्यनळ्या या शक्यतो जमिनीत १ फुट गाडाव्यात. असे केल्याने पाईप वरती सूर्यप्रकाशाचा परिणाम न होता शेवाळाची वाढ होत नाही. तसेच पाईपचे आयुष्यमान वाढते. ३) पुढच्या हंगामासाठी ठिबक सिंचन उपयोगात आणण्यासाठी क्लोरीनची किंवा आम्लाची प्रक्रिया करणे गरजेचे असते.रासायनिक प्रक्रियेने तयार झालेल्या थरासाठी उपाय म्हणून आम्ल प्रक्रिया करणे गरजेचे असते .तर जिवाणूमुळे तयार झालेळे अडथळे दूर करण्यासाठी क्लोरिनची प्रक्रिया गरजेची असते . ४) आम्ल पाण्यात मिसळावायचे झाल्यास पाण्यात आम्ल टाकावे पाणी आम्लात टाकू नये. क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची व्यवस्थित हाताळणी करणे गरजेचे असते .
५) पाण्यात असणाऱ्या मातीचे व क्षारांचे प्रमाण लक्षात घेऊन गाळणयंत्रणा स्वच्छ व कार्यक्षम ठेवावी. ६) मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्याची यंत्रणा, पाणी मोजण्याचे मीटर व गाळण यंत्रणा नियमितपणे तपासाव्यात. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ९ऑगस्ट १८
89
0