AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न होणार साकार!
☑️अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत असून शेतीसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर सारख्या यंत्राच्या खरेदीवर व्याज सवलत योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे व याची सुरुवात दसऱ्यापासून झालेली आहे. ☑️तसेच या महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व त्यासोबतच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना देखील प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार असून याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. ☑️संदर्भ:Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
5
इतर लेख