सल्लागार लेखअॅग्रोवन
ट्रॅक्टरची निगा व देखभाल राखण्यासाठी काही खास टिप्स!
• ट्रॅक्टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्य होते; परंतु ट्रॅक्टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलेंडर लायनर, कनेक्टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. क्रॅंक शाफ्ट ग्राइंडिंग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह सीटसुद्धा बदलावे लागते.
• ट्रॅक्टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. सर्वसामान्य ट्रॅक्टरच्या कार्याचा विचार करता एकूण ४००० तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेसरमध्ये घसारा येतो व पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते, तसेच सिलिंडर लायनर व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात.
• व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीट रिफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑइल सील, रेडिएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसेच कनेक्टिंग रॉडच्या बेरिंगमधील क्लिअरन्स (फट) तपासून ठीक करावी लागते.
• साधारणतः जेव्हा ट्रॅक्टरच्या कामाचे ८००० तास पूर्ण होतात तेव्हा क्रॅंकशाफ्ट व कॅमशाफ्टची तपासणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागते. शक्यतो दुसऱ्या ओव्हरहॉलिंगच्या वेळेस पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावे.
• इंजिन ओव्हरहॉल करताना पिस्टनच्या डोक्यावरील रिंग वरील खाचामधील तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह दांडीवरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी. सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुऊन काढावेत.
• इंजिन हेड जोडताना नवीन गॅसकेटचा वापर करावा. सिलिंडर गॅसकेटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोहोंची शक्यता वाढते.
• बहुतांश वेळेस असे लक्षात आले आहे, की ट्रॅक्टरची दुरुस्ती ही होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. सुगीच्या वेळी होणारी मोडतोड थांबवण्यासाठी ज्या वेळी सुगी संपते व रिकामा वेळ उपलब्ध असतो अशा वेळी ट्रॅक्टरची दुरुस्ती करावी.
• बहुतांश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपर्यंत ट्रॅक्टरची दुरुस्ती लांबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही जास्त खर्चाला सामोरे जावे लागते.
• सुगी सुरू होण्यापूर्वीच काही महत्त्वाचे सुटे भाग विकत घेऊन ठेवावेत, म्हणजे सुगीच्या काळात सुट्या भागांच्या कमतरतेमुळे व योग्य प्रकारचा भाग न मिळाल्याने होणारा वेळेचा अपव्ययही टाळता येईल.
यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ - अॅग्रोवन,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.