AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो रोपवाटिकेचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो रोपवाटिकेचे नियोजन!
टोमॅटोची लागवड महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत यशस्वीरीत्या केली जाते. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आवश्‍यक आहे. रब्बी हंगामासाठी बी पेरणीचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबर असून ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर कालावधीत रोपांची पुनर्लागवड करावी. • एक एकर क्षेत्रासाठी १.२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. • टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी ४० ते ६० ग्रॅम बियाणे एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. • रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. १ मी. रुंद व १ फूट उंचीचे गादी वाफे तयार करावेत किंवा प्रचलित ट्रेमध्ये रोपे तयार करावीत. • गादी वाफ्यामध्ये कुजलेले शेणखत @५ किलो, १९-१९-१९ @८० ग्रॅम किंवा १५-१५-१५ @१०० ग्रॅम चांगले एकसारखे मिसळावे. • बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर जीवाणू संवर्धन ॲझोटोबॅक्‍टर व पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात. • त्यानंतर हाताने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर एक-एक बी पेरावे. • झारीने हलकेच पाणी द्यावे. • साधारणपणे हे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. • हि रोपे २५ दिवसांमध्ये पुनर्लागवडी योग्य होतात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-,अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख